Posts

Books by Satyajit Ray

Image
SATYAJIT RAY Well, there is a lot of things that is great about this person, I will humbly try to write down a few for you He is not just film director but also a fiction writer, publisher, illustrator , calligrapher, graphic designer and film critic. And mind you, he was very good at all of these. In films: his first film Pather Panchali won 11 international prizes. he made trilogy in 1950's which is the trend nowadays. His films progressed as the time progressed, starting from British Raj days, superstitious family holds to a modern India, his films captured all essence of life in India. By the end of it, he got many awards for his work the list is here List of awards conferred on Satyajit Ray In fiction: He created Feluda, a detective, and Professor Shonku, a scientist, both characters of children's fiction which are very popular in Bengali literature. His sci-fi adventures of the Professor Shonku were very much ahead of time. In illustration: He designed the posters for alm...

No Tabacco Day

Image
जे सिगारेट ओढतात त्यांनी कालचा एक दिवस तरी सिगारेट ओढली नसेल, हे आपण सांगू शकत नाही. तसं आपण सध्या काहीच सांगू शकत नाही आणि सिगारेट किंवा कुठलेही व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तर नाहीच नाही. मीही तसं सांगितलं नाही आज पर्यंत. पण ज्यांच्या बरोबर बोलावसं वाटतं, त्यांना मात्र मी एकदा बोलतो मित्रत्वाच्या नात्याने. तसेच आजही मी तुमच्याशी बोलतोय. हा सल्ला नाही किंवा उपदेश नाही. मुळात या स्वार्थी जगात एक स्वार्थी विचार केला , तर सिगारेट ओढणे न ओढणे यामुळे काहीच फरक पडत नाही ( जो पर्यंत स्वतः च्या खिशातील पैसे दयावे लागत नाहीत).  पण त्याचा समोरच्या ओढणाऱ्यालालाही काय फायदा होतोय असे दिसत नाही. उलट त्यांच्या मधील राग, अस्थिरता वाढलेलीच दिसते. काहींना वाटतं, ते त्यांचं मूड ठीक करणारं, ताण कमी करणारं औषध आहे. तर मग इलाज झाल्यावर ते सोडून दयायला हवं ना. पण हे औषध मात्र रोग , आजार आणखीनच वाढवत नेतं, हे त्या औषधाच्या गुंगीत लोकांना समजतच नाही. आणि मग ते व्हेंटिलेटर बनून जातं. मग मित्रांनो तुम्हाला हे असं व्हेंटिलेटरवर जगायचय का? काहीजण असंही तत्वज्ञान मांडतात, मरण कसं ही येतच! त्यात सिगारेट ओ...

माणूस (Human)

Image
"ज्याला स्वतःचे व्यक्तिमत्व आहे स्वतःची बुद्धी, मन आहे ; त्यामुळे संवेदना आहेत आणि जो स्वतःच्या न्याय बुद्धीने निर्णय घेऊ शकतो, असं सृष्टीतलं संमिश्र स्वरूप म्हणजे माणूस होय" असं मला वाटतं. मग कोणी म्हणेल हे आहे किंवा नाही कसं ठरवावं. काही दिसेल असं बोला की, म्हणजे शरीराचे अवयव ज्ञानेन्द्रिय हे सर्व असलं म्हणजे माणूसच असणं की हो. दिसणं आणि असणं यातच तर फरक आहे. हवा दिसत नाही पण असते. तसंच मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण जाणवतात आणि मग माणूस दिसतो.  म्हणून माणूस बनणं ही एक प्रक्रिया आहे. आपण जन्माला आलो म्हणजे झालं, असं होत नाही. तर ती प्रक्रियेतील पहिली पायरी असते. त्यानंतर आपण समाजात वावरायला लागलो की आपल्याला आपण लगेचच कोणीतरी मोठे झाल्यासारखं वाटतं. पण मुळात जेव्हा आपण स्वतः ला दुसऱ्याच्या आचार - विचारांशी जुळवून घ्यायला शिकू, निती मूल्ये जाणून घेऊ, श्रद्धा- अंधश्रद्धा यांचा फरक समजून संस्कार जपू , तेव्हा कुठे आपण माणूस बनण्याच्या प्रकियेत सहभागी होऊ. माणूस म्हणून आपली ही अशी उत्क्रांतीची प्रकिया सुरूच असते. माणसाकडे काही विशेष उपजत गुण आहे...

"दो पल के इस जीवन से इक उम्र चुरानी है"

Image
"दो पल के इस जीवन से इक उम्र चुरानी है"   हे जेव्हा मी ऐकलंय तेव्हा ते फक्त गाण्यातील काही शब्द म्हणूनच कानावर पडले आणि निघून गेले असतील. पण जेव्हा परत मी हे वाचलं, ऐकलं.. तेव्हा हे लॉकडाऊन, कोरोना प्रकरण चालू झालं होतं आणि माझ्या मते त्यामुळेच ते एकदम माझ्या मनात कोरलं गेलंय आणि आता कायमचं फेवरेट बनून गेलंय.. काहीतरी पुन्हा उमगल्या सारखं जाणवलय.. मला वाटतं पूर्ण जीवन- मृत्यूच सारच या शब्दांत मांडलेल आहे . ' दो पल का जीवन' एवढं सरळ साधं वास्तव असेल तरी आज मग एवढा आकांड तांडव , हैदोस का ... तर त्याचा ही उलगडा पुढे लगेच आहे.. ' इक उम्र चुरानी है '... तर यासाठी चाललीय ही धडपड.  पण लोकहो प्रत्येकवेळी च ही अश्या पद्धतीने केलेली धडपड कामी येईल का.. ये उम्र चुरानी कोई आसान काम थोडी है ! त्यासाठी गरज लागते शांतपणे विचार करण्याची, त्यासाठी लागतं धैर्य, त्यासाठी लागते सहनशीलता. तेव्हा विचार करा .. तुम तो चुरा के जी लोगे जिंदगी, पण कुठेतरी एखाद लहान बाळ असेल, ते तुमच्या अराजकते पायी त्याचे ' दो पल ' पण जगू शकणार नाही. तेव्हा एवढी सजगता , समजूतदारणा आपण ठेवल...

थोडसं बोलू का..

मुळात कुठलीही गोष्ट घराबाहेर येवून, balcony त राहून का करायला सांगतायत हे कळत नाहीये..? आपल्या कडे घरात दिवा लावून, घरात प्रार्थना करण्याची परंपरा आहेच की. बरं आपल्या कडची बहुतेक घरही घराला लागूनच आहेत किंवा दोन घ रं ओळखु न येणार अशीही आहेत.. झोपडपट्टी विषयी तर वेगळं नको सांगायला.. आपल्या देशातील बऱ्यापैकी जनता अशीच राहतेय हे बंगले आणि फ्लॅट्स मध्ये राहणाऱ्यांना हे माहीत असावं. अशावेळी ".....घराबाहेर उभं राहून करा" असं म्हटल्यावर घोळके होणार नाहीत तर काय.. बरं प्रकाशाची शक्ती जाणून घ्यायची तर लाईट बंद करून पायरी वर बसून आकाश पहा. त्यासाठी परत तुम्ही कशाला दिवे लावताय.. आणि नाहीतर म्हणे मोबाईल टॉर्च.. बसं करा हो ! त्याला तर लोकं बाथरूम मध्ये जातानाही सोडत नाहीयेत.  तसंही निसर्गाने आपली शक्ती दाखवली च आहे.. बरं तुम्ही हे सर्व कृतज्ञता दर्शवण्यासाठी करताय का.. तर मग ज्यांच्या साठी करताय त्यांनी ते पाहण्यासाठी परत रस्त्यावरच उभं रहावं, अशी इच्छा आहे का ? जर त्यांच्याबद्दल एवढीच कृतज्ञता असती तर त्या सर्वांना आज बाहेर रहायची गरजच लागली नसती..तेही घरीच त्यांच्या स्वकीय, मु...