No Tabacco Day

जे सिगारेट ओढतात त्यांनी कालचा एक दिवस तरी सिगारेट ओढली नसेल, हे आपण सांगू शकत नाही. तसं आपण सध्या काहीच सांगू शकत नाही आणि सिगारेट किंवा कुठलेही व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तर नाहीच नाही. मीही तसं सांगितलं नाही आज पर्यंत. पण ज्यांच्या बरोबर बोलावसं वाटतं, त्यांना मात्र मी एकदा बोलतो मित्रत्वाच्या नात्याने. तसेच आजही मी तुमच्याशी बोलतोय. हा सल्ला नाही किंवा उपदेश नाही.

मुळात या स्वार्थी जगात एक स्वार्थी विचार केला , तर सिगारेट ओढणे न ओढणे यामुळे काहीच फरक पडत नाही ( जो पर्यंत स्वतः च्या खिशातील पैसे दयावे लागत नाहीत).  पण त्याचा समोरच्या ओढणाऱ्यालालाही काय फायदा होतोय असे दिसत नाही. उलट त्यांच्या मधील राग, अस्थिरता वाढलेलीच दिसते. काहींना वाटतं, ते त्यांचं मूड ठीक करणारं, ताण कमी करणारं औषध आहे. तर मग इलाज झाल्यावर ते सोडून दयायला हवं ना. पण हे औषध मात्र रोग, आजार आणखीनच वाढवत नेतं, हे त्या औषधाच्या गुंगीत लोकांना समजतच नाही. आणि मग ते व्हेंटिलेटर बनून जातं. मग मित्रांनो तुम्हाला हे असं व्हेंटिलेटरवर जगायचय का? काहीजण असंही तत्वज्ञान मांडतात, मरण कसं ही येतच! त्यात सिगारेट ओढल्याने काय होतय ? अरे हो, पण स्वतःच्या हाताने का ओढवून घ्यायचय मरण.. आणि तेही दुसऱ्याला पैसे देऊन?? खरचं, गावी नाही एवढं पण मुंबईत तर गेली दोन-चार वर्ष मी या लाखोंच्या पैशांवर (सिगारेटच्या थोटक्या वरून) चालत जात होतो तेव्हा  'मरण किती महाग आहे' असच वाटायचं. बरं 'सस्ती चीजों का शौक हम नहीं रखते' असं म्हणत फॅशन म्हणून महागात महाग सिगारेट शोधून ओढली जातेय. आणि तिकडे त्या कंपन्या सोशल वेलफेअर च्या नावाखाली थोडंसं दान, फंड जमा करून राजरोसपणे माणसांना मारक औषध विकताहेत. सरकारची याला मान्यता आहे म्हटल्यावर आपणाला ही औषध च म्हणावं लागेल ! आणि हे असं व्यसन सरकार चालवण्यासाठी किती गरजेचं आहे, हे आपण गेल्या lockdawn ला पाहिलं नाही का ? पण आपल्याला नुसतीच पहायची सवय.. पण जरा 'वाचाल तर वाचाल'.. माझा लेख नाही त्या सिगारेट च्या पाकिटावर लिहिलेला सल्ला. मग लोकहो कसली काळजी करता आणि आमचं धन्य सरकार कसल्या बाता करतय, जिथे 'harmful for your health' असं ठासून लिहून एखादी गोष्ट विकली जातेय आणि विकत घेतली जातेय.
मी मुद्दाम हून 'डॉक्टर काय म्हणतात..' अस म्हणून वैद्यकीय भाषेत बोललो नाही कारण जे डॉक्टर एखादी सर्जरी पार पाडल्यावर स्वतः सिगारेट ओढतात आणि तेच आपले आदर्श बनतात. आणि हे का तर स्वतः च्या व्यसणाचं समर्थन करण्यासाठी.
दोस्तों कमबख्त ये मौत ना रोक सकते..
पर अपने ही हातों से अपना गला घुटना तो रोक सकते !


No Tobacco Day

We can't say that those who smoke cigarettes may not have smoked at least one day yesterday. You can't say anything right now, and speechless to people who are addicted to cigarettes or anything. Also I haven't said that till today. But for those with whom I want to talk, I speak once as a friend. That's why I am talking to you today. This is not advice or sermon.

Basically in this selfish world, it doesn't matter if you smoke or don't (unless have to pay out of pocket). But even it does not seem to benefit the person who are smoking. On the contrary, their anger and instability seem to have increased. Some people think that it is a drug that can improve their mood and reduce stress. So after treatment, you should have to give it up. But people do not understand that this drug only aggravates the disease. And then it becomes a ventilator. So friends, do you want to live on a ventilator like this? Some people even say that death is real truth! What happens when you smoke a cigarette in it?Oh yes, but why do you want to drag death with your own hands .. and that too by paying someone else ?? Actually, not so much in the village, but in Mumbai, for the last two years, when I was walking on these lakhs of money (from a cigarette butt), I used to think, 'How expensive is death'. By saying, 'we don't have a hobby of cheap things?'it is fashion to look for expensive cigarettes. And there, under the guise of social welfare,  companies are selling these medicines to the people by contributing small donations and funds. Yes If the government says it is approved, then you have to call it medicine! And haven't we seen just how much this addiction is needed to run a government? But we all used to with the habit of just seeing .. but a little 'read to be alive' .. not my article, written advice on the pack of cigarettes. Then how do people care and how does our clever government talk, where something is sold and bought with the inscription 'harmful for your health'.

I did not deliberately use medical language as 'what the doctor says ..' because doctors who smoke cigarettes after undergoing a surgery become their role models. And this is to support one's own addiction. 

friends, can't stop this death.. But You can stop strangling with your own hands!



Comments