माणूस (Human)

"ज्याला स्वतःचे व्यक्तिमत्व आहे स्वतःची बुद्धी, मन आहे ; त्यामुळे संवेदना आहेत आणि जो स्वतःच्या न्याय बुद्धीने निर्णय घेऊ शकतो, असं सृष्टीतलं संमिश्र स्वरूप म्हणजे माणूस होय" असं मला वाटतं. मग कोणी म्हणेल हे आहे किंवा नाही कसं ठरवावं. काही दिसेल असं बोला की, म्हणजे शरीराचे अवयव ज्ञानेन्द्रिय हे सर्व असलं म्हणजे माणूसच असणं की हो. दिसणं आणि असणं यातच तर फरक आहे. हवा दिसत नाही पण असते. तसंच मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण जाणवतात आणि मग माणूस दिसतो. 
म्हणून माणूस बनणं ही एक प्रक्रिया आहे. आपण जन्माला आलो म्हणजे झालं, असं होत नाही. तर ती प्रक्रियेतील पहिली पायरी असते. त्यानंतर आपण समाजात वावरायला लागलो की आपल्याला आपण लगेचच कोणीतरी मोठे झाल्यासारखं वाटतं. पण मुळात जेव्हा आपण स्वतः ला दुसऱ्याच्या आचार - विचारांशी जुळवून घ्यायला शिकू, निती मूल्ये जाणून घेऊ, श्रद्धा- अंधश्रद्धा यांचा फरक समजून संस्कार जपू , तेव्हा कुठे आपण माणूस बनण्याच्या प्रकियेत सहभागी होऊ.
माणूस म्हणून आपली ही अशी उत्क्रांतीची प्रकिया सुरूच असते. माणसाकडे काही विशेष उपजत गुण आहेतच. पण ते गुण टिकवून ठेवण्यासाठी निसर्गाची साथ, प्रेरणा घेणे आवश्यक आहे. कारण शेवटी माणूस हे निसर्गाचेच मूल आहे. तेव्हा जग कितीही आधुनिक झालं, तरी निसर्गाच्या साथीनेच ' माणूस' या शब्दाला, रूपाला परिपक्वता मिळेल.

I think that the one who has his own personality, has his own intellect and mind; therefore he has sensations and he who can make decisions with his own judgmental intellect, that's the composite nature of creation is Human.Then someone will say how to decide whether it is or not. Talk about things that can be seen. That is to say, all the organs of the body, the senses are all human beings. But there is a difference between appearing and being. The air is not visible but it is. Also all the things I mentioned at the beginning you don’t see but feel and then the man appears.
So becoming a human being is a process.It doesn't happen when you are born. So that is the first step in the process. After that, we started to live in the society and immediately we feel like grown up. But basically when we learn to adapt ourselves to the behavior of others, to know the values ​​of ethics, to understand the difference between faith and superstition and preserve the rites. then where we do participate in the process of becoming a human being. As human beings, this process of evolution continues. Man has some special innate qualities. But in order to maintain those qualities, it is necessary to take help, inspiration from nature. Because in the end man is the child of nature. So, no matter how modern the world becomes, the word, the form 'human' will get maturity only with the help of nature !


Comments