"मनात" - अच्युत गोडबोले

    मनात हे पुस्तक वाचताना वाचनात आलेला हा एक परिच्छेद किंवा छोटीशी गोष्ट आहे. 


    गौतम बुद्ध आपल्या शिष्यासह एकदा प्रवास करत होते. त्यांना तहान लागली आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं की, " आलो त्या रस्त्यावर दोन तीन मैल मागे एक छोटा ओढा लागला होता त्याचं पाणी घेऊन ये."

     शिष्य त्या ओढ्याजवळ पोचला तेव्हा काही बैलगाड्या त्यातून पार झाल्यामुळे पाणी गढूळ झालं होतं. तळाची सर्व घाण कुजकी पानं वर आली होती. शिष्यानं ते पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. पण ते जास्तच गढूळ झालं. त्यामुळे तो पाणी न घेता तसाच परतला. त्यानं परतून बुद्धाला ओढ्याच्या गढूळ पाण्याविषयी सांगितलं आणि "पुढे नदी आहे, मी तिचं पाणी आणतो" असं हि सांगितलं . पण बुद्धानं " मला त्याचं ओढ्याचं पाणी हव आहे , तू परत फिर आणि पाणी घेऊन ये "असं सांगितलं. थोड्या नाराजीनच तो शिष्य त्या ओढ्याकडे गेला. पण तो जाईपर्यंत पाणी बरंच निवळलं होतं. थोडा पाला पाचोळा मध्येच प्रवाहासोबत आला पण शिष्य जेव्हा शांतपणे त्या प्रवाहाकडे बघत बसला तेव्हा ती घाण ही वाहून गेली. हे बघितल्यावर शिष्याला मग बुद्धाचा मुद्दा लक्षात आला.

    'मनाच्या प्रवाहाला हवं तसं वाहू दिलं की ते हळूहळू निवळत जातं. एखाद्या घटनेने मनात येणारे क्षणिक विचार मनाला अस्वस्थ करून सोडतात. मन सैरभैर होतं.  पण ते निवळलं की सार स्वच्छ होत जातं. मनात येणारे तरंग हलके हलके विसावतात.'

click, order and  read  from _ "मनात" - अच्युत गोडबोले

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Books by Achyut Godbole

Charcoal - कोळसा