Charcoal - कोळसा
Charcoal - कोळसा
हा लेख मी काही यातील तज्ञ म्हणून लिहीत नाहीये, मी ही शिकतोय. फक्त जे जाणवलं, कळलं ते शेअर करावं इतकंच.
तर charcoal-कोळसा संदर्भात मी शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही पहिला असेल नसल्यास माझ्या fb पेज MP#ART / MP वर जाऊन पहावा. त्यात मी details देत नाही बसलो कारण ज्याला खरोखर इंटरेस्ट असतो तो वाचतो, पहातो कुठूनही शिकतोच.
तर चारकोल पेन्सिल किंवा चार्कोल या पासून चांगली स्केचेस होऊ शकतात. परंतु आपल्याला शिकण्याच्या पिरेड मध्ये त्याविषयी फार काही माहिती नसते. Rather मलाही हल्ली हल्ली कळालं. परंतु तुम्ही ऑनलाईन किंवा स्टोअर मधे जाऊन चेक केलात तर कळेल त्याची cost ही तुलनेने थोडी जास्त असते. एकदम इनिशियल स्टेज ला ते घेणं आपल्याला परवडत नाही आणि त्याची गरज ही नसते. तर अशावेळी आपण हा घरातील लाकडाचा कोळसा use करू शकता. हो खरंच एकदा घरी वापरून पहा.
वापर करण्या अगोदर त्यातील सॉफ्ट/मऊ कोळसा बाजूला काढून त्याला पेपर कटर किंवा पॉलिश पेपर ने घासून थोडंसं पेन्सिल फॉर्म मध्ये आणू शकता.
स्केच करताना strokes merge करण्यासाठी तुम्ही बोटांचा अथवा टिश्यू पेपर चा वापर करू शकता. >
अशाप्रकारे तुम्ही daily प्रॅक्टिस करून त्यापासून चांगली स्केचिंग स्किल डेव्हलप करू शकता.
मी केलेली काही स्केचेस >
एक काळजीही घेतली पाहिजे चारकोल ची पावडर उडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावर तुम्ही fixative spray use करू शकता.
आपल्याकडील असणारा कोळसा याच्या लिमिटेशन निश्चितच आहेत. त्यासाठी तुम्ही एकदा स्केच करू लागलात की ऑनलाईन available असणाऱ्या पेन्सिल मागवू शकता.
म्हणणं फक्त एवढंच थांबू नका, प्रॅक्टिस करत रहा !
कसा वाटला लेख कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही जे माहीत असेल तेही शेअर करा..😊
ऑनलाईन available असलेल्या वस्तू -
1. For Beginners Charcoal pencils_ CAMEL
2. Charcoal pencils _ FABER CASTEL
3. Charcoal pencils _ set of 12 shades FABER CASTEL 12PCS
4. SET OF ART (USEFUL FOR ALL) _ ART KIT SET
5. White pencils _ (can use for highlight or on black paper for sketching) WHITE PENCILS
6. A4 SKETCHING PAD _ BURSTO SKETCHING PAD A4 SIZE
7. A5 SKETCHING PAD _ ANUPAM SKETCH PAD A5 SIZE (PACK OF 2)
8. FIXATIVE SPRAY _ CAMEL OR BURSTO
nice
ReplyDeletevery inspiring
ReplyDelete