Charcoal - कोळसा हा लेख मी काही यातील तज्ञ म्हणून लिहीत नाहीये, मी ही शिकतोय. फक्त जे जाणवलं, कळलं ते शेअर करावं इतकंच. तर charcoal-कोळसा संदर्भात मी शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही पहिला असेल नसल्यास माझ्या fb पेज MP#ART / MP वर जाऊन पहावा. त्यात मी details देत नाही बसलो कारण ज्याला खरोखर इंटरेस्ट असतो तो वाचतो, पहातो कुठूनही शिकतोच. तर चारकोल पेन्सिल किंवा चार्कोल या पासून चांगली स्केचेस होऊ शकतात. परंतु आपल्याला शिकण्याच्या पिरेड मध्ये त्याविषयी फार काही माहिती नसते. Rather मलाही हल्ली हल्ली कळालं. परंतु तुम्ही ऑनलाईन किंवा स्टोअर मधे जाऊन चेक केलात तर कळेल त्याची cost ही तुलनेने थोडी जास्त असते . एकदम इनिशियल स्टेज ला ते घेणं आपल्याला परवडत नाही आणि त्याची गरज ही नसते. तर अशावेळी आपण हा घरातील लाकडाचा कोळसा use करू शकता. हो खरंच एकदा घरी वापरून पहा. वापर करण्या अगोदर त्यातील सॉफ्ट/मऊ कोळसा बाजूला काढून त्याला पेपर कटर किंवा पॉलिश पेपर ने घासून थोडंसं पेन्सिल फॉर्म मध्ये आणू शकता. स्केच करताना strokes merge करण्यासाठी तुम्ही बोटांचा अथवा टिश्यू पेपर चा...
Comments
Post a Comment