संत तुकारामांच्या माळेचे मणी
" संत तुकारामांच्या माळेचे मणी विखुरले आहेत सर्वत्र.. जमतील तेवढे वेचून घ्यावे आणि माळ बनवावी सुंदर !" शाळेत असताना या ओळी शिक्षकांकडून कानावर पडलेल्या. तेव्हापासून माझं वेचण मी चालू केलं. त्याचा भावार्थ मला कळलेला किंवा मी घेतलेला असा आहे की जीवनात अनेक चांगल्या गोष्टी पसरल्या आहेत सर्वत्र ; त्यावर लक्ष केंद्रित करावा आणि जमतील तेवढ्या अंगी बाणवाव्या. मला वाटतं प्रत्येकाने जीवनातील, एक - दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीवर फोकस केला ; तर जीवन थोडंसं सोपं होऊन जाईल आणि तुम्हीही आनंदी रहाल. म्हणजे कसं एखाद्या विषयी बोलताना, त्याला समजावताना जर त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आपण पहिल्यांदा सांगितल्या तर आपोआपच त्या समोरच्या व्यक्तीचा फोकस त्या चांगल्या गोष्टीवर जाईल तो चांगल्या गोष्टीचं वारंवार विचार करेल. आणि त्याच्या वाईट गोष्टी आपोआप मागे पडतील.. हो नक्कीच मी बोलतोय एवढं सोप्प नाहीच आहे मुळात. पण एखादा माणूस संपूर्णपणे वाईट किंवा चांगला कधीच नसतो ; म्हणून तो माणूस असतो ! म्हणून जेव्हा आपल्याला एखादी वाईट, चुकीची गोष्ट दिसेल कदाचित ते वाईट, चुकीचंही नसेल पण त्या परिस्थितीत त्या व्यक्ती कडून ते घडलेलं असत आणि या दृष्टीने त्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर लगेच नाही पण नक्कीच फरक पडेल. त्यासाठी थोडी नजर बदलण्याची गरज असते म्हणजे गोष्टींना थोडसं सकारात्मक नजरेने पाहिलं पाहिजे.
वाईट गोष्टींना शिक्षा जरूर झाली पाहिजे. पण मला वाटतं एखादा माणूस वाईट गोष्टीकडे वळण्याअाधीच त्याला त्यातील उत्तम गोष्टींशी सांगड घालून दिली पाहिजे.
आणि असं प्रयत्न करायला काय हरकत आहे.. नाही का?
"The beads of Sant Tukaram's necklace are scattered everywhere .. Pick up as many as you can and make the necklace beautiful! " these lines were heard by the teachers while I was in school. Since then I have continued my collection. The meaning I found or taken is that there are many good things in life Focus on it and collects/ apply as many as you can. I think if everyone focuses on each other's good things, life will get a little easier and you will be happy too.
Just like, always when explaining to someone or while talking about someone, , if you tell them the good things in them for the first time, then the person in front of you will automatically focus on that good thing and he will think about the good thing again and again. And his bad things will automatically fall behind .. Yes, of course It's not that simple. But a humans are never entirely bad or good; So they are the Humans ! So when you see something bad, wrong, it may not be bad, wrong, but it would have happened from that person in that situation, and if you try to look at it from this point of view, not immediately, but it will definitely make a difference. It requires a little change of perspective means things need to be seen in a positive way .
Bad things must be punished. But I think a person should get attached with the good things before they turn towards the bad.
And like this atleast we can try .. isn't it?
Thats great idea. I never think like that but from this time i will change some approach about any person to look at him
ReplyDeleteThanks mp
Thank you so much!
DeleteGood one
Deletethank you !
Delete