Posts

Showing posts from December, 2020

संत तुकारामांच्या माळेचे मणी

Image
    " संत तुकारामांच्या माळेचे मणी विखुरले आहेत सर्वत्र.. जमतील तेवढे वेचून घ्यावे आणि माळ बनवावी सुंदर !" शाळेत असताना या ओळी शिक्षकांकडून कानावर पडलेल्या. तेव्हापासून माझं वेचण मी चालू केलं. त्याचा भावार्थ मला कळलेला किंवा मी घेतलेला असा आहे की जीवनात अनेक चांगल्या गोष्टी पसरल्या आहेत सर्वत्र ; त्यावर लक्ष केंद्रित करावा आणि जमतील तेवढ्या अंगी बाणवाव्या. मला वाटतं प्रत्येकाने जीवनातील, एक - दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीवर फोकस केला ; तर जीवन थोडंसं सोपं होऊन जाईल आणि तुम्हीही आनंदी रहाल. म्हणजे कसं एखाद्या विषयी बोलताना, त्याला समजावताना जर त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आपण पहिल्यांदा सांगित ल्या तर आपोआपच त्या समोरच्या व्यक्तीचा फोकस त्या चांगल्या गोष्टीवर जाईल तो चांगल्या गोष्टीचं वारंवार विचार करेल. आणि त्याच्या वाईट गोष्टी आपोआप मागे पडतील.. हो नक्कीच मी बोलतोय एवढं सोप्प नाहीच आहे मुळात. पण एखादा माणूस संपूर्णपणे वाईट किंवा चांगला कधीच नसतो ; म्हणून तो माणूस असतो ! म्हणून जेव्हा आपल्याला एखादी वाईट, चुकीची गोष्ट  दिसेल कदाचित ते  वाईट, चुकीचंही नसेल पण त्...